व्हॉलीबॉल स्पर्धेत लंबडपल्ली संघाने मारली बाजी
सिरोंचा पोलिसांतर्फे जनजागरण मेळाव्यात व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
अतिदुर्गम भागातील खेळाडूंच्या कलागुणांवा वाव देण्यासाठी जिल्हा पोलिस सातत्याने प्रयत्नरत आहे. पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा खिडकीअंतर्गत सिरोंचा पोलिसांच्या वतीने नुकताच भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेत लंबडपल्ली संघाने बाजी मारली. पोलिस दलातर्फे विजेत्या संघासह उपविजेत्या संघास रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पोलीस दादाला खिडकीच्या अंतर्गत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या संकल्पनेअंतर्गत अहेरी अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांचे नेतृत्वाखाली भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस ठाणे हद्दीतील खेळाडूंकरीता व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सामन्याचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नपं अध्यक्ष बबलू पाशा, पोलिस ठाणे हद्दीतील पोलिस पाटील, एसआरपीएफ, सीआरपीएफचे अंमलदार, पोलीस निरीक्षक गायकवाड तसेच ठाण्याचे अंमलदार उपस्थित होते.
व्हॉलीबॉल स्पर्धेत लंबडपल्ली संघाने उत्कृष्ट खेळा प्रदर्शन करीत अव्वल स्थान पटकाविले. सदर संघास तीन हजाराचे प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तर तिसरे पारितोषिक 1 हजार रुपयाचे अनुसूचित जमाती प्रवर्गातील वसतिगृहातील विद्यार्थांनी पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.