श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांच्या जयंती प्रित्यर्थ विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

0


श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांच्या जयंती प्रित्यर्थ विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

 श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आष्टी येथे श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 16 /11/ 2022 ते 18/ 11/ 2022 या तीन दिवसामध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आज दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ पी के सिंग यांच्या हस्ते पार पडला या तीन दिवसीय विविध क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेट, हॉलीबॉल, बॅडमिंटन, चेस, कॅरम ,आणि कबड्डी , खो खो इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अभ्यासक्रमिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे तेव्हा सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्यामध्ये असलेले क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा असे सांगितले या उद्घाटन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे ग्रंथालय व रा से यो प्रमुख डॉ रमेश सोनटक्के, डॉ अपर्णा मारगोनवार ,डॉ दीपक नागापुरे, प्रा सुबोध साखरे, प्रा सचिन मुरकुटे, प्रा जया रोकडे, प्रा राहुल आवारी, प्रा कवींद्र साखरे , विजय खोब्रागडे, अविनाश जीवतोडे , संदीप मानापुरे, कुमारी शुभांगी डोंगरे, कु सविता गारघाटे ,श्रीमती उषा माहूर पवार, आणि वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !