शिवाजी महाराजांची तुलना इतरांसोबत होऊच शकत नाही
आमदार कपिल पाटील
अहेरीत शिक्षक भारतीचा महामेळावा
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे.त्यांचे कार्य हे महान आहे. कोणताही भेदभाव न करता त्यांनी सर्व धर्मातील, लोकांना समान न्याय दिला.एक आदर्श राज्यकर्ता म्हणून त्यांना विश्वात ओळखले जाते.शिवाजी महाराजांची तुलना आताच काय तर पुढे सुध्दा कुणासोबतही होऊच शकत नाही,असे मत शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मत व्यक्त केले ते अहेरी येथील कन्यका मंदिर सभागृहात आयोजित शिक्षकाच्या महामेळाव्यात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन समन्वयक शिक्षक भारती महाराष्ट्र अतुल देशमुख यांचे हस्ते पार पाडले.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राजेंद्र झाडे राज्य उपाध्यक्ष शिक्षक भारती, शिक्षक भारतीचे नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, राज्यसमन्वयक संजय खेडीकर, राज्यसमन्वयक सचिव किशोर वरबे,सपन नेहरोत्रा, विलास गभणे उपस्थित होते.
आज आपल्यापुढे अनेक प्रश्न उभे ठाकले असतांना अशाप्रकारचे वक्तव्य करुन समाजात दुही निर्माण करण्याचे काम काही राजकारणी करीत आहेत.शिक्षणाचा बाजार त्यांनी मांडला आहे. शिक्षकांच्या मुलभूत समस्या न सोडविता त्यांना वेळो-वेळी अपमानित केल्या जात आहे.ग्रामीण भागातील जि.प.शाळा बंद करण्याचा घाट यांनी रचला आहे.गरिबांची मुले शिकुच नये असे या राज्यकर्तेना वाटते.सरकारचे एकुण धोरणे लक्षात घेता शिक्षणाचे सुध्दा खाजगीकरण होते की काय अशी भिती वाटायला लागली आहे.प्रत्येक शासन निर्णयात फाटे फोडून ते शिक्षण व शिक्षक यांना वेठीस धरत आहेत.यांना बाबासाहेबांच्या संविधानाचे काही देने घेने नाही सर्व मनमानी कारभार केल्या जात आहे.म्हणून आपण सर्वांनी वेळीच सावध होऊन सरकारचा हा डाव हाणून पाडला पाहिजे.
शिक्षकां सबंधी ज्या समस्या असतील त्या आपण येत्या हिवाळी अधिवेशनात मांडू. आपल्या समस्या जानूण घेण्यासाठीच मी मुंबईहून अहेरीत आलो आहे .आपले प्रश्ण सोडवायला मी शासनाला भाग पाडणार आहे.फक्त आपली साथ मला हवी आहे.मी लढण्यासाठी तयार आहे.असेही पुढे मार्गदर्शन करतांना शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सांगीतले.या महामेळाव्याला मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षीका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक भारती गडचिरोली जिल्हाध्यक्ष अरुण मुनघाटे यांनी केले.सूत्रसंचालन शिक्षक भारती गडचिरोलीचे सचिव विष्णु दुनेदार यांनी केले. उपस्थितीतांचे आभार पुंडलिक देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. संजय शास्त्रकार विभागीय उपाध्यक्ष शिक्षक भारती,
राजेश काञटवार, विजय मेश्राम, पुंडलिक देशमुख अमरदिप भुरले,राजना बिट्टीवार,श्रीकांत राऊत,एन. डी. चतुर,प्रणय येगोलपवार,विठ्ठल भसारकर,सदानंद भरडे तथा वरिष्ठ महाविद्यालय विभाग, एम.सी.व्ही.सी. विभाग, आश्रमशाळा विभाग , शिक्षक भारतीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व शिक्षक परिवार गडचिरोली जिल्हा यांचे सहकार्य मीळाले..

