वनपरिक्षेत्र कार्यालय देलनवाडी अंतर्गत पक्षी सप्ताह 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा केला जातो. विशेष करून या काळात पक्षाचे निरीक्षण केले जात असते. राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्व विशद व्हावे, पक्षी संरक्षणाबाबत लोकजागृती व्हावी हे यामागचे उददेश आहे.
महाराष्ट्रात पक्षाच्या एकुण 577 जाती असुन जगभरातील पक्ष्याची जैवविविधता झपाटयाने कमी होत असुन,अनेक पक्षी प्रजाती दुर्मीळ श्रेणीत समाविष्ट होत आहेत. राज्यातील पक्ष्याचे महत्व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवुन त्यांच्या संरक्षणाप्रती जबाबदारी स्पष्ट व्हावी यासाठी देलनवाडी वनपरिक्षेत्राता अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली. तसेच वरील सप्ताहदरम्यान विविध प्रजातीचे पक्षाचे निरीक्षण करण्यात आले व देलनवाडी वनपरिक्षेत्रामधील शाळेतील मुलांना पक्षांची ओळख व त्यांचे महत्व पटवुन देण्यात आले.. वनपरिक्षेत्र कार्यालय देलनवाडी अंतर्गत पक्षी सप्ताहाचे समारोपीय कार्यक्रम दिनांक 12.11.2022 ला कुथे पाटील विद्यालय उराडी येथे घेण्यात आले असुन शाळेतील विद्यार्थ्याना मौजा उराडी येथील गावतलाव येथे नेवुन विविध अस्तीत्वात असलेल्या पक्षाविषयी मुलांना ओळख करून माहिती देण्यात आली. पक्षाचे महत्व त्यांना वनकर्मचारी यांनी पटवून दिले. कार्यक्रास मा. श्री. स्वप्नील बी. ढोणे वनपरिक्षेत्र अधिकारी देलनवाडी. श्री. राधेश्याम दडमल उपसंरक्षपंच उराडी श्री .झोडे सर, जनबंधु सर, ठाकरे सर, पुस्तोडे सर तलमले बाबुसाहेब, श्री.एस.व्हि. नारनवरे क्षेत्र सहाय्यक देलनवाडी, श्री.बि.सी. मडावी क्षेत्र सहाय्यक मांगदा तसेच उराडी गावातील नागरीक व वनकर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.के.टी.कुळमेथे वनरक्षक उराडी व आभार प्रदर्शन श्री.आर.पी. नन्नावरे वनरक्षक देलनवाडी यांनी केले.

