समाजाने एक मूठ धान्य दान करावे-- प्रा. डॉ. भारत पांडे
अशोक खंडारे संपादक
वैनगंगा वार्ता
सततच्या पडणाऱ्या पावसामुळे जमिनीत असणारे जीव जंतू,किडे, पडलेले धान्य नष्ट झाल्यामुळे चिमणी,कावळाव ईतर पक्षांना खाण्यासाठी धान्य नसल्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने पशूंची दिवाळी साजरी करण्याकरिता एक मूठ धान्य पशु पक्षी करिता दान करण्याचे आव्हान प्रा. डॉ.भारत पांडे समाजशास्त्र विभागप्रमुख यांनी समाजाला केले.महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय फुलझले यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभागाद्वारे समाजाला पक्षी, पशुकरिता एक मूठ धान्य दान करण्याचे आव्हान केले त्या आव्हानाला महाविद्यालयाच्या परिसरातील जवळपास 50 गावातील लोकांशी विद्यार्थ्यांनी संपर्क करून पक्षांची ही दिवाळी साजरी करावी याविषयी प्रत्यक्ष समाजाशी संपर्क करून त्यांना पशुंच्या विषयी व त्यांचे महत्त्व पटवून दिले आणि त्याच सोबत त्यांच्याकडून एक मूठ धान्य दान स्वरूपात घेतले सर्व 50 गावातील लोकांशी जमा केलेले धान्य समाजशास्त्र विभागाद्वारे आष्टी येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथील डॉ.सोनक देशमुख, हरिलाल केंद्रे, अशोक एडलावार,आर.के. घोडाम,रुपेश कडाबे यांच्याकडे विद्यार्थ्यांनी गोळा केलेले धान्य जमा केले आणि सतत एक वर्ष आम्ही आमच्या गावातील लोकांना पक्षांचे महत्त्व पटवून देऊन प्रत्येक घरात त्यांच्या परिसरात एक मूठ धान्य टाकण्याचे व घराच्या छतावर पिण्याचे पाणी ठेवण्याचे कार्य करण्याचे समाजशास्त्र च्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले या पश्चांच्या दिवाळी साजरी करण्याच्या अभिनव विचाराला समाजातील अनेक मान्यवरांनी आजपर्यंत आम्ही स्वतःची दिवाळी साजरी केली परंतु यानंतर आम्ही आमच्या सोबतच पर्यावरणाच्याही विचार करू पक्षी आणि पशुकरिता देखील आम्ही काही धान्य,काही फळे देखील त्यांच्यासाठी राखून ठेवू असे समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना सांगितले. आपलेच मुलं आपल्याला पर्यावरणाविषयी पशु- पक्षी विषयी जिव्हाळ्याने सांगत आहे यांचेही त्यांना कौतुक वाटले कारण की आजची युवा पिढीला आज मोबाईलचे व्यसन, वेड लागलेले आहे अशा वातावरणात आजच्या युवक आपल्या समाजाविषयी आपल्या सभोवतालच्या पशु -पक्षी विषयी, पर्यावरणाविषयी विचार मांडतो कडकडीने त्यांचे रक्षण करण्याचे आवाहन करतो हे बघून विद्यार्थी घडविण्याचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय करीत आहे अशा विश्वास पालक वर्गात झालेला आहे.हा अभिनव प्रयोग यशस्वी करण्याकरिता प्रा. ज्योती बोबाटे,प्रा. शाम कोरडे, प्रा. रवी गजभिये, डॉ. गणेश खुणे, डॉ.रवी शास्त्रकार, प्रा.सालोरकर मॅडम,प्रा. गबने मॅडम व समाजातील प्रतिष्ठित लोक व समाजशास्त्राच्या व लोकसंख्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. देशात पहिल्यांदाच पक्षी करिता दिवाळी साजरी करण्याच्या अभिनव प्रयोगझालेला असून यापूर्वी उन्हाळ्यात प्रत्येक ठिकाणी पशु करिता दाना आणि पाण्याची सोय करण्यात येते परंतु आजपर्यंत देशात कुठेही पक्षांची दिवाळी साजरी झाली पाहिजे असा प्रयोग झालेला नाही आणि म्हणून केवळ उन्हाळ्यातच नाही तर पक्षीना वर्षभर दाना आणि पाणी लागतो म्हणून एक मूठ धान्य दान हा प्रयोग देश स्तरावर व्हावा यासाठी समाजशास्त्र विभागाद्वारे प्रा.डॉ. भारत पांडे एक सामाजिक विचारधारा निर्माण करण्याकरता प्रयत्न करणार आहे आणि त्यामुळे पक्षी वर्षभर कोणकोणते दाणे खातात, सततच्या पडणाऱ्या पाण्यामुळे त्यांचे खाद्य नष्ट झाले याविषयी जागतिक स्तरावर विचार करून जगाच्या जागतिक स्तरावर पक्षी करिता त्या त्या परिसरातील भौगोलिक वातावरणांनुसार वर्षभर समाजाने त्यांच्याकरिता खाद्य जमा करावे, खाद्य दान करावे कारण की पर्यावरण टिकण्यासाठी पर्यावरणाची साखळी असणे देखील महत्त्वाचे आहे आणि म्हणून हा प्रयोग एक अभिनव प्रयोग आहे.

