सुभाषग्राम येथील २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन केली आत्महत्या

0

सुभाषग्राम येथील २२ वर्षीय विवाहितेने  गळफास घेऊन केली आत्महत्या


आष्टी :- वैनगंगा वार्ता १९

चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथील २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. दिपाली प्रसंजित हलदर (वय २२, रा. सुभाषग्राम, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आष्टी पोलीस ठाण्यात दाखल मर्ग नोंदीनुसार, दिपाली हलदर या श्री विद्या निकेतन कॉन्व्हेंटच्या स्कूल बसवर मुला-मुलींना ने-आण करण्याचे काम रोजंदारीने करीत होत्या. घटनेच्या दिवशी सकाळी ७ ते ७.४५ वाजताच्या दरम्यान त्यांचे पती त्यांना शाळेत काम करण्याऐवजी घरी राहून मुलाबाळांची काळजी घेण्यास सांगून खर्रा आणण्यासाठी चौकात गेले होते. त्यानंतर दिपाली यांनी राहत्या घरातील खोलीत खिडकीला लाल रंगाच्या दुपट्ट्याने गळफास घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर आष्टी पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक ५८/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार हरिचंद्र पोच्चुजी झाडे करीत आहेत. प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक गोकुलदास मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !