काटली येथील सामाजिक कार्यकर्ते चुडाराम खंडारे यांचे निधन
गडचिरोली:- गडचिरोली तालुक्यातील काटली येथील सामाजिक कार्यकर्ते चुडाराम खंडारे यांचे आज दि. ११ नोव्हेंबर ला १२ वाजता निधन झाले
मृत्यू समयी चुडाराम खंडारे यांचे वय ७६ वर्षें असून वृद्धापकाळाने निधन झाले. उघा दि. १२ नोव्हेंबर ला सकाळी ९.०० वाजता काटली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
त्याच्या मागे दोन मुले , नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे

