एका युवतीचे शेतात जाऊन जहरी औषध प्राशन केल्याने झाला मृत्यू
कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील घटना
कुरखेडा:- आपल्या वडिलांच्या शेतात जाऊन विषारी औषध प्राशन केले त्यामुळे उपचार सुरू असताना तीचा मृत्यू झाला ही घटना कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे घडली
मृतक कुमारी मुन्नी दीपक हुडको वय 18 वर्ष रा . मालेवाडा असे आहे
मिळालेल्या माहितीनुसार कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील कु. मुन्नी हुडको ही युवती आपल्या शेतावरती सकाळच्या सुमारास गेली होती. मात्र बराच वेळ होऊनही ती घरी परत न आल्याने घरातील आई-वडील व नातलग यांनी शेताकडे धाव घेतली व बघितले असता घरच्यांना ती बेशुद्ध अवस्थेत पडून दिसून आली आणि तिने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे लक्षात येताच तिला तातडीने लगेच मालेवाडा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आले.
मात्र तीची हळूहळू प्रकृती जास्त खालावत गेल्याने तिला मालेवाडा येथील डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तिला पुढील उपचाराकरिता कुरखेडा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सदर युवतीवर उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली अशी माहिती मिळाली आहे. तिच्या एकाकी जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे गावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मालेवाडा येथील युवतीने शेतावर जाऊन का म्हणून विषारी द्रव्य प्राशन केले व आत्महत्या का केली हे मात्र तपासा अंती कळून येईल

