स्मृतिशेष शिक्षण महर्षी प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आष्टी येथे रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप
वैनगंगा वार्ता १९
आष्टी (अशोक खंडारे):-
श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आष्टी येथे 10 ऑक्टोबर 2026 रोजी श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली चे माजी संस्थाध्यक्ष स्मृतीशेष शिक्षण महर्षी स्व.प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे साहेब यांची 15 व्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी स्मृतीशेष स्वर्गीय प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एम. माटे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अपर्णा मारगोनवार,वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख, पी.के.सिंग, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. एम. पी. सिंग, रसायनशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. सोनाली ढवस, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी मंचावर उपस्थित होते. डॉ. अपर्णा मारगोनवार यांनी प्रास्ताविक मधून महाविद्यालयाच्या स्थापने पासून आतापर्यंत महाविद्यालयाने केलेली प्रगती व उपलब्ध शैक्षणिक सुविधा याची माहिती दिली.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. डी. एम. माटे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, स्व. प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांनी लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचा वटवृक्ष झालेला असून त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीमुळेच आज महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेत आहे, असे विचार व्यक्त केले. पुण्यतिथी औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय, आष्टी येथे भरती असलेल्या कुपोषित बालक व सर्व रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन संचालन प्रा.सुबोध साखरे तर आभार डॉ.दिपक नागापुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालयातील डॉ,राजेश गजबे, डॉ.रोशन सरकार, महाविद्यालयातील इतर प्राध्यापक वृंद डॉ. प्रदीप कश्यप, प्रा. महेश सिलमवार, प्रा.सचिन मुरकुटे, प्रा.जया रोकडे, प्रा.कविंद्र साखरे, प्रा.राहुल आवारी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी रविंद्र झाडे, सविता गारगाटे, अविनाश जिवतोडे, विजय खोब्रागडे, शुभांगी डोंगरे, रमेश वागदरकर,उषाताई माहूरपवार, पौर्णिमा गोहणे आदीनी सहकार्य केले.

