स्पर्धेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवणे महत्त्वाचे प्राचार्य किशोर पाचभाई

0

स्पर्धेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवणे महत्त्वाचे प्राचार्य किशोर पाचभाई 



आष्टी:-
दिनांक 24/09/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथे स्पर्धा परीक्षा च्या धरतीवर सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य किशोर पाचभाई तसेच आष्टी येथील केंद्राच्या केंद्रप्रमुख रामगिरीवार महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राज मुसणे, पत्रकार अशोकभाऊ खंडारे, केंद्र शाळेचे ज्येष्ठ शिक्षक किशोर कुरवटकर, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलचे पर्यवेक्षक घाटबांदे, ज्येष्ठ शिक्षिका अंजली कोडमलवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना पत्रकार अशोक खंडारे यांनी शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे खूप कौतुक केले. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर प्राचार्य डॉ राज मुसणे यांनी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये भाग घेऊन आपला शैक्षणिक दर्जा उंचवावा असे संबोधीत केले. यानंतर ज्येष्ठ शिक्षक किशोर कुरवटकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहून अभ्यासाशी मैत्री करा असे सुतोवाच केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य किशोर पाचभाई यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची जोपासना व त्यांच्या वाढीसाठी करावे लागणारे शर्तीचे परिश्रम शाळा घेण्यास तयार आहे, फक्त विद्यार्थ्यांनी त्या उपक्रमामध्ये स्वयं स्फूर्तीने भाग घेऊन आपला शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि विद्यार्थ्यांना एक आदर्श नागरिक घडवण्याचा प्रयत्न करू असे मोलाचे प्रतिपादन प्राचार्य किशोर पाचभाई यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांची परीक्षा शाळेच्या खुल्या प्रांगणात घेण्यात आली. या परीक्षेला वर्ग पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी संपूर्ण शिकवलेल्या अभ्यासक्रमावर आधारित वैकल्पिक प्रश्नांची प्रश्नावली तयार करून स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका व ओ एम आर शीट देण्यात आली. या अभिनव उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा आनंदाने परीक्षेमध्ये सहभाग दर्शवला. या परीक्षेसाठी सर्व शिक्षकांनी मेहनत घेऊन प्रश्नसंच तयार केला. या करिता सर्वश्री अंकलेश रोहनकर, अनिल पिसे, विनोद भुरसे, श्रीनिवासन वेनमपल्ली, राज कोलते, राजेशम आंबीलपु, पायल दोरशेटवार, नंदा मिलमिले, मानतेश रत्नावार आधी शिक्षकांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा मोलाचे योगदान दिले.या कार्यक्रमाचे संचालन संदीप पोरेड्डीवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सुशील अवसरमोल यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !