आष्टीत पदवीधर मतदान केंद्र देण्यात यावे-- प्रा. डॉ. भारत पांडे

0

आष्टीत पदवीधर मतदान केंद्र देण्यात यावे-- प्रा. डॉ. भारत पांडे


वैनगंगा वार्ता १९ (अशोक खंडारे):-
 नागपूर विभाग पदवीधर मतदान संघासाठी दिनांक 23 ऑक्टोबर 2026 ला मतदान असून आष्टी येथे पदवीधर मतदानाकरिता मतदान केंद्र देण्याची मागणी प्रा.डॉ. भारत पांडे अध्यक्ष ओम विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांनी केलेली आहे.कोणतीही निवडणूक यशस्वी करण्याकरीता मतदान करणाऱ्या व्यक्तींना सोयीचे असेल अशा ठिकाणी मतदान केंद्र उपलब्ध करून दिल्यास जास्तीत जास्त मतदाते मतदान केल्यास निवडणूक यशस्वी होते. सन 1 डिसेंबर 2020 मध्ये आष्टी परिसरातील चौडमपल्ली, चपराळा, गांधीनगर, सुभाषग्राम या परिसरातील पदवीधरांना मतदान करीता चामोर्शी येथे जावे लागले होते.आज चपराळा, चौडमपल्ली ते चामोर्शी यांचे अंतर 45 किलोमीटर असल्यामुळे त्याच्या थेट परिणाम मतदान कर्त्यावर व मतदानाच्या टक्केवारीवर होतो. त्याचबरोबर कमी वेळ, प्रवासाच्या साधनाचा असुविधा व खराब रस्ते अशा सर्वांच्या परिणाम मतदानावर होत असून. त्याचबरोबर चामोर्शी येथे तहसील कार्यालयात मतदान केंद्र हे शहराचा बाहेर असून आधार (लिफ्ट ) घेतल्याशिवाय मतदात्याला मतदान केंद्रावर जाता येत नाही. त्यामुळे पदवीधराने जास्तीत जास्त मतदान करावे, त्यांच्यात उत्साह निर्माण व्हावा,याकरिता आष्टी परिसरातील पदवीधराकरिता आष्टीमध्येच मतदान केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी प्रा. डॉ. भारत पांडे अध्यक्ष ओम विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांनी केलेली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !