बहुजन समाज पार्टी जिल्हा गडचिरोली यांचा आष्टी येथे भव्य क्षेत्रीय कार्यकर्ता मेळावा सम्पन्न
आष्टी :- (अशोक खंडारे)
बहुजन समाज पार्टी जिल्हा गडचिरोली सेक्टर आष्टी येथे आयोजित भव्य क्षेत्रीय कार्यकर्ता मेळावा व जाहीर सभेचे आयोजन यशस्वीपणे पार पडले आहे
या कार्यक्रमात बहुजन समाजाने बसपाच्या माध्यमातून शासनकर्ते बनण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य मार्गदर्शक इंजिनियर गोपाल खांबाळकर यांनी केले.
देशातील मनुवादी व्यवस्थेला उलथवून पाडण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणीची राष्ट्रीय पक्ष बहुजन समाज पार्टी भक्कमपणे उभी आहे. त्यामुळे सर्वांनी. व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यात बीएसपीच्या पाठीशी उभे राहून बहन सुश्री मायावती यांना साथ द्यावी, असे खांबाळकर यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात चार वेळा मुख्यमंत्री म्हणून मायावतींनी भारतीय राज्यघटनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून बहुजन महापुरुषांना मानसन्मान दिला. तेथील जनतेला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक न्याय देऊन जमिनीचा प्रत्यक्ष कब्जा देऊन तीन ते चार एकर जमीन वाटप केली. शिक्षण क्षेत्रात विद्यापीठे स्थापन करून शिक्षणाची दारे सर्वांसाठी मोकळी करून खऱ्या अर्थाने बहुजनांचे राज्य प्रस्थापित केले. हे महान कार्य देशपातळीवर घडवण्यासाठी मायावतींना पंतप्रधान बनविणे हे ध्येय बहुजन समाजाने साध्य करावे, असे ते म्हणाले.
खांबाळकर यांनी उपस्थित बंधू-भगिनींना दीड तास मार्गदर्शन करून प्रबोधन केले. कार्यक्रम आष्टी येथील राजदीप फंक्शन हॉल, पेपर मिल रोड, ईलूर, आष्टी येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष बसपा जिल्हा उपाध्यक्ष सोमा धारणे,
प्रमुख अतिथीं जिल्हा महासचिव सुधीर वालदे, जिल्हा तसेच जगेश्वर माने (जिल्हा प्रभारी व आरमोरी विधानसभा इन्चार्ज), गणपत तावाडे (जिल्हा प्रभारी व अहेरी विधानसभा इन्चार्ज), माजी गडचिरोली-चिमूर लोकसभा उमेदवार प्रा. रामराव नन्नावरे, केशव भालेराव (गडचिरोली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष), विलास मशाखेत्री (गडचिरोली विधानसभा क्षेत्र महासचिव), मायाताई मोहुर्ले (महिला जिल्हाध्यक्ष), सुमनताई कराडे (जिल्हा कार्यकारणी सदस्य), वेणूताई खोब्रागडे (महिला गडचिरोली शहराध्यक्ष), दुष्यंत चांदेकर (माजी जिल्हाध्यक्ष), उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेक्टर अध्यक्ष विनोद दुर्गे, थोरात अवथरे, शेषाद्र उंदीरवाडे, विलास कुकुडकर, रवी गोंगले, कैलास दुर्गे, एकनाथ डोर्लीकर, नितीन डोर्लीकर, कैलास बावणे, अंकुश गेडाम, गेणराज बनकर, प्रफुल अलोने, पारखचंद फुलझेले, आष्टी सेक्टरमधील कार्यकर्ते, हितचिंतक, युनिट, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. फंक्शन हॉल उपलब्ध करून देणाऱ्या उंदीरवाडे व मुख्य मार्गदर्शक खांबाळकर यांचा पक्षाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन जयंत अवथरे यांनी केले, तर प्रास्ताविक शेषांद्र उंदीरवाडे यांनी सादर केले. उपस्थितांचे आभार अनिल गोंगले यांनी मानले. आष्टी परिसरातील बसपा कार्यकर्ते,महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

