BIG BRAKING NEWS गडचिरोली जिल्ह्यात पोलिस - नक्षल चकमक दोन महिला नक्षल ठार

0
BIG BRAKING NEWS 

गडचिरोली जिल्ह्यात पोलिस - नक्षल चकमक दोन महिला नक्षल ठार 



गडचिरोली:-
 जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांभिया पोलिस स्टेशन अंतर्गत मोडस्के जंगलात आज दुपारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षली महिलांना कंठस्नान घातले. घटनास्थळावरुन पोलिसांनी स्वयंचलित रायफलीसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा ताब्यात घेतला आहे.

मोडस्के जंगलात गट्टा दलमचे काही नक्षली दबा धरुन बसल्याची माहिती मिळाल्यानंतर अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयाचे अपर पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या सी-६० दलाची पाच पथके त्या परिसरात नक्षलविरोधी अभियानावर रवाना करण्यात आले होते. 
शिवाय गट्टा पोलिस ठाण्यातील पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाच्या १९१ बटालियनच्या पोलिसांनी बाहेरुन नक्षल्यांना घेराबंदी केली. अभियान सुरु असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युतर दिले व दोन नक्षली महीलांना यमसदनी धाडले

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !