अखेर मुलचेरा तालुक्यातील करोडो रुपयाची वृक्षतोड प्रकरणी वनपाल-वनसंरक्षक निलंबित

0
अखेर मुलचेरा तालुक्यातील करोडो रुपयाची वृक्षतोड प्रकरणी वनपाल-वनसंरक्षक निलंबित



आष्टी:- मुलचेरा तालुक्यातील पेडीगुड्डम वनपरिक्षेत्रातील
गोमणीच्या जंगलात करोडो रुपयाचे सागवन अवैध वृक्ष तोड प्रकरणात चौकशी करून दोषीवर कारवाई करावी या मागणीसाठी समाजसेवक व अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे गडचिरोली जिल्हा संयोजक शंकर ढोलगे आलापल्ली हे मुख्यवनसंरक्षक मुख्य वनविभाग कार्यालय गडचिरोली समोर उपोषणाला बसले असता क्षेत्र सहाय्यक नरेंद्र सिडाम व वनरक्षक सचिन म्हस्के यांना या प्रकरणी राहुल सिंह टोलिया उपवनसरंक्षक आलापल्ली वनविभाग निलंबनाची कारवाई केली. आलापल्ली यांनी मुलचेरा वनविभाग कार्यालय अंतर्गत वनविभाग नियतक्षेत्र गोमणी व मुकडीटोला च्या जंगलात सागवन झाडाची कत्तल करण्यात आली होती या प्रकरणी शंकर ढोलगे यांनी 29 मे रोजी पुराव्यासोबत तक्रार केली होती. सदर प्रकरणाची चौकशी करून अहवालाआधारे दोन व्यक्तीवर निलंबनाचा बडगा उभारण्यात आला.
आता वनपट्याच्या जमिनितून अवैध मुरूम उत्खनन साठी शंकर ढोलगे यांचे उपोषण सुरू आहे. ढिय्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते शंकर ढोलगे , कृष्णा वाघाडे, रविंद्र सेलोटे, विलास भानारकर, प्रविण ठाकरे आदि सहभागी आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !