कोंबड्या कापण्याच्या हत्याराने हिशोबनीस नौकराला पाठविले यमसदनी, स्वतः गेला पोलीसांना शरण

0
कोंबड्या कापण्याच्या हत्याराने हिशोबनीस नौकराला पाठविले यमसदनी, स्वतः गेला पोलीसांना शरण 


मूल : - कोंबड्या कापण्याच्या हत्याराने हिशोबनीस नौकराला मालकाने सपासप वार करुण यमसदनी पाठविल्याची घटना मुल तालुक्यातील मारोडा येथे ११ जून ला १२ वाजताच्या सुमारास घडली 
मूल तालुक्यात सध्या स्थितीत घरकुल बांधकामाची चांगलीच लगबग सुरू असून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप करणे सुरू असल्याने आरोपी अमित निकेसर यांचेकडे ट्रॅक्टर असल्याने रेतीचा व्यवसाय करतात. त्यांचाच मित्र म्हणून मृतक शंतनू येरमे हा नोकर म्हणून काम पाहत होता. त्याच कामाच हिशेब देण्यासाठी शंतनु येरमे हा अमितकडे गेला होता. हिशोब देण्यावरूनच मालक व नोकर या दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आणि रागाच्या भरात अमित निकेसरने अमीत चिकन सेंटर मधील कोंबड्या कापण्याच्या सत्तूरने शंतनूच्या पोटावर आणि छातीवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात शंतनू जागीच कोसळला व गतप्राण झाला 

घटना घडल्या बरोबर आरोपी अमित निकेसरने स्वतः मुल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेली आपबीती पोलिसांना सांगितली. पोलीसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून शंतनूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुल येथील उप जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मुल पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी हे झालेल्या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत या घटनेने मारोडा परिसरात एकच खळबळ उडाली असून, पुढील तपासातूनच या प्रकरणाची अधिक माहिती समोर येईल.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !