पोलीस निरीक्षक साहेब, माझ्या मुलाची आत्महत्या नसून हत्याच

0
पोलीस निरीक्षक साहेब, माझ्या मुलाची आत्महत्या नसून हत्याच?


 प्रज्योतच्या वडीलानी दिली पोलिस स्टेशन मध्ये तक्रार

वणी:-
 मारेगांव तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्प येथे दि.२६ मार्च रोज मंगळवारला वणी  तालुक्यातील रासा येथील भिमराव मारोती मुन यांचा २१ वर्षीय मुलगा प्रज्योत भिमराव मुन याचा मृतदेह नवरगाव धरण परिसरात आढळून आला असून प्रज्योत ने विष प्राशन केले  असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

भिमराव मुन यांनी मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून आपल्या प्रज्योतची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा तक्रारीतून आरोप केला आहे. तक्रारीत असे म्हटले आहे की, प्रज्योत मंगळवार दि.२६ मार्च रोजी सकाळी ८:३० वाजता घरून कामावर निघुन गेला असल्याचे म्हटले आहे परंतू संध्याकाळपर्यंत घरी परत न आल्यामुळे त्यांनी त्याच्या मोबाइलवर फोन केले. परंतु फोन उचलला गेला नाही.
दुसऱ्या दिवशी भिमराव मुन आणि त्यांचे दोन भाऊ वणी येथे प्रज्योतच्या मित्रांना भेटून त्याच्याबाबत चौकशी करत होते. त्याच वेळी वणी पोलीसांनी त्यांना नवरगाव धरण परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती दिली. भिमराव मुन आणि त्यांच्या बंधूंनी मृतदेह पाहिला असता तो प्रज्योतचाच असल्याचे दिसून आले.
भिमराव मुन यांनी तक्रारीत म्हटले आहे की, प्रज्योतच्या मृत्यूच्या ठिकाणी विषारी द्रव्य मोनोशीलचा डब्बा आढळून आला आहे. त्यामुळे त्याच्या मुलाला विष पाजून हत्या केल्याचा संशय आहे. त्यांनी मागणी केली आहे की, प्रज्योतच्या मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी त्याच्या मोबाइलवर आलेल्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत झालेल्या संभाषणाचा तपास करावा. तसेच, हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींवर कठोर कारवाई करावी.

पोलिसांनी तपास सुरू केला आहे

मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ साहेब यांनी सांगितले,की सदर तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत याच्या कडे दिला आहे.आणि या प्रकरणीतील प्रत्येक बिंदूची बारीक, तपासणी करून, प्रत्येक गोष्टीवर तपास, स्पॉट पंचनामा योग्य रित्या केला जाईल आणि जे सत्य असेल ते समोर आणण्याचा प्रयत्न करेल 
 प्रज्योतच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. त्याच्या मोबाइलचा तपासही केला जात आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !