BIG BREAKING
प्रेयसीच्या धमकीला कंटाळून प्रियकराने प्राशन केले किटकनाशक
जळगाव :
प्रेयशीने प्रियकराला वारंवार धमकावले की लग्न कर अन्यथा चार लाख रुपये दे, असा सारखा तगादा लावणाऱ्या प्रेयसीला कंटाळून 28 वर्षीय प्रियकराने किटकनाशक प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मुक्ताईनगर मध्ये घडली आहे
तरुणाने दिलेल्या जबानीवरून प्रेयसीसह तिच्या मैत्रिणीविरोधात मुक्ताईनगर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या 28 वर्षीय तरुणाची इन्स्टाग्रामवर तरुणीशी ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये एक वर्षांपासून प्रेम संबंध निर्माण झाले मात्र तरुणीने लग्नासाठी तगादा सुरू केला तसेच लग्न कर अन्यथा चार लाख रुपये दे, अशी मागणी केली तसेच रक्कम न दिल्यास पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
गुरुवार 7 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता चिखली शिवारातील शेतात तरुणासोबत पुन्हा तरुणीने लग्नासाठी तगादा लावला व लग्न न केल्यास चार लाखांची मागणी केली तसेच तरुणी सोबतच्या मैत्रिणीने देखील चिथावणी दिली. धमकीला कंटाळून 28 वर्षीय तरुणाने किटकनाशक प्राशन केले व त्यास उपचारार्थ मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तरुणाने दिलेल्या बयाना वरून प्रेयसी सह तिच्या मैत्रिणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.अधीक तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रघुनाथ पवार करीत आहेत.

