आष्टी:-
श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था अंतर्गत श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान वाणिज्य महाविद्यालय आष्टी येथे दिनांक २१ सप्टेंबर २००२३ ला राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारा आयोजित "मेरी माटी मेरा देश व अमृत कलश या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक रा से यो अधिकारी डॉक्टर रमेश सोनटक्के यांनी मातीचा आणि मानवाचा संबंध काय आहे या धरतीसाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या क्रांतिवीराच्या बलिदानाचे स्मरण भारत माते विषयी सर्वांमध्ये राष्ट्रभावना जागृत करणे व सोबतच आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये कशा प्रकारची माती आहे त्या मातीमध्ये कोणत्या प्रकारचे उत्पादन घेतले जाते व कोणत्या प्रकारचे खनिज संपत्ती आहे या विषयाची जनजागृती व्हावी मातीचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असे सांगितले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पिके सिंग यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मेरी माती मेरा देश ही संकल्पना समजावून सांगितली या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक त्यामध्ये, डॉ अपर्णा मारगोनवार डॉ दीपक नागापुरे डॉसोनाली धवस, डॉ एम पी सिंग प्रदीप कश्यप डॉ प्रकाश राठोड प्रा महेश सिलमवार व प्रा सुबोध साखरे व इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालक डॉक्टर दीपक नागापुरे यांनी केले व आभार प्रदर्शन डॉक्टर प्रकाश राठोड यांनी केले

