महाराष्ट्र बंदला दलित अत्याचार विरोधी कृती समितीचा पाठींबा

0
 महाराष्ट्र बंदला दलित अत्याचार विरोधी कृती समितीचा पाठींबा


सोलापूर:-जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी  हल्ल्याचा दलित अत्याचार विरोधी कृती समितीने तीव्र शब्दात धिक्कार केला असून ,लोकशाहीमध्ये प्रत्येक भारतीयाला आपले मत मांडण्याचा व लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. 
    जो गरीब आहे ; तो दलित आहे. आंदोलन करणार्‍या गरीब मराठा समाजाच्या पाठीशी आम्ही असून रविवार दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला दलित अत्याचार कृती समितीचा पाठींबा असून कृती समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन कृती समितीचे राज्य अध्यक्ष प्रा. डी.के.साखरे यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !