डॉक्टर दांपत्याना खंडणी मागणाऱ्या आरोपींना अवघ्या बारा तासातच पोलीसांनी घेतले ताब्यात
न्यायालयाने दिले पोलीस कोठडीचे आदेश
आरमोरी:-
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयातील. डॉ. सोनाली धात्रट यांच्या निवासस्थानी ४ ऑगस्ट २०२३ रोजी काही आरोपी शिरले व त्यांनी तुमची बातम्या देऊन बदनामी करु अशी धमकी देऊन पाच लाख रुपयाची खंडणी मागितली वत्यांनी डॉ. धात्रट यांच्या पर्समधून एक लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतले. मागणी पूर्ण न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. याची तक्रार डॉ. धात्रट यांनी आरमोरी पोलिसांत केली. आरमोरी पोलिसांनी आरोपीविरोधात दरोडा, घरास घुसखोरी तसेच धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपास सुरू केला.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाणे आरमोरी यांच्या संयुक्त कार्यदलाची स्थापना केली. या दलाने संशयितांचा माग म्हणाला काढला. रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले.
याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी नागपूर शहरातून पाच जणांना अटक केली. तपासादरम्यान धक्कादायक खुलासे समोर आले. काही आरोपींचे पेड न्यूज नावाच्या वृत्तवाहिनीशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. यावरून अधिकाऱ्यांनी चॅनलशी संबंधित तपास सुरू केला आहे.
१२ तासांत आरोपींचा लावला छडा
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता आणि सहाय्यक पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. तक्रार दाखल केल्यापासून अवघ्या 12 तास आरोपीला पकडण्यात मोठे यश आले. यामुळे पोलिसांच्या या पथकाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
आरमोरी व गडचिरोली पोलिसांनी खंडणी रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी नागपुरातील एका पत्रकारासह पाच जणांना अटक केली. नागपुरातील यूट्यूब पत्रकार अमित वांद्रे, दिनेश कुंभारे, विनय देशभ्रतार, रोशन बारमासे आणि सुनील बोरकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. या टोळीने आरमोरी येथील एका महिला डॉक्टरसह तिचे पती अमोल धात्रक यांना धमकावून 5 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.