वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकरी ठार

0
वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकरी ठार.




चिमूर:-

 सध्याच्या घडीला शेतीच्या कामाला बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे अशातच शेतामध्ये वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार चिमूर तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या ब्राह्मणगाव येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ऋषिकेश देवतळे वय साठ वर्ष हे  ठार झाल्याची घटना घडली आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्पा जवळच शेतामध्ये घडली घटना स्थळावर वनविभागाची टीम दाखल झाली शेतकऱ्याचे प्रेत पोस्टमार्टम करिता चिमूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आल्याची माहिती आहे
 सध्या शेताच्या कामाला वेग आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जंगला लगय असल्याने जनावरांचे हल्ले शेतकऱ्यावरती होतात मात्र शेती जंगलात असून सुद्धा शेतकऱ्यांना शेतावरती स्वतःची कामे करण्याकरता जावे लागते प्रशासनाने या वाघाचा बंदोबस्त लवकरात लवकर लावावा आणि वाघाच्या हल्ल्यापासून मानवी जीवनाला वाचवावे असे सुद्धा परिसरात बोलले जात आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !