कूरखेडा -:
मनिपूर राज्यात महिलावर झालेल्या पाशवी अत्याचाराचा निषेध करीत या विरोधात आज सोमवार रोजी येथील उपविभागीय कार्यालयावर विविध ७ संघटनेचा वतीने संयुक्त निषेध मूक मोर्चा काढण्यात आला व उपविभागीय अधिकारी मार्फत राष्ट्रपतीना निवेदन पाठविण्यात आले
मनिपूर येथे एका समूहा द्वारे महिलांची नग्न धिंड काढत त्यांचावर सामुहिक अत्याचार करण्यात आला हे कृत्य अत्यंत निषेधार्य आहे याघटनेचा निषेध करीत येथील भारतीय महिला मंडळ कार्यालय गांधी चौक येथून मोर्चा निघत शहरातून फेरी मारत येथील उपविभागीय कार्यालयावर धडकला यावेळी घटनेतील सर्व आरोपीना अटक करीत त्यांचाविरोधात फास्ट ट्रैक कोर्टात प्रकरण चालवित न्याय सूनिश्चित करण्यात यावा या राज्यात शांतता प्रस्थापित करण्याकरीता आवश्यक उपाय योजणा करण्यात यावी तसेच पिडीताना शारिरीक,भावनिक व वित्तीय साहायता प्रदान करीत त्यांचे पूनर्वसन करण्यात यावे यासह अन्य मागण्याचे निवेदन राष्ट्रपति याना पाठविण्यात आले निवेदन उपविभागीय अधिकारी यांचावतीने नायब तहसीलदार बोके यानी स्वीकारले यावेळी तहसीलदार राजकूमार धनबाते ठाणेदार संदीप पाटील सामाजिक कार्यकर्ते डॉ सतीश गोगूलवार उपस्थीत होते. मोर्चात क्रांतीज्योती महिला संघटणा गडचिरोली चंन्द्रपूर,विदर्भ दिव्यांग संघटणा, भारतीय महिला मंडळ कूरखेडा, संजीवनी महिला बचत गट परिसर संघ कूरखेडा,एकल महिला संघटणा कूरखेडा,गांव संघटणा तालुका कूरखेडा,ग्रामसभा महासंघ कूरखेडा/वडसा यांचा सहभाग होता मोर्चाचे नेतृत्व शूभदा देशमुख,सूधाताई नाकाडे,आशाताई बानबले,नर्मदा डेकाटे,कूमारीबाई जमकातन,मयूर राऊत,यशवंत पाटणकर,कृष्णा नरोटे,कूणाल गूरनूले,संगीता तूमळे, लीलावती वघारे यानी केले मोर्चात मोठ्या संख्येत महिला व पूरूष मंडळी उपस्थीत होते