शेळ्यांना नदिकाठावरुन बाजूला करने बेतले दोन मुलांच्या जीवावर

0
हृदयद्रावक घटना
शेळ्यांना नदिकाठावरुन बाजूला करने बेतले दोन मुलांच्या जीवावर


दोन्ही शाळकरी मुलांना जलसमाधी


गोंदिया:-
जिल्हा अंतर्गत मुंडीपार खुर्द येथील नदीपात्रामध्ये दोन मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना 29 जुलै रोजी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार खुर्द पांगोली नदी काठालगत गंगाधर भिवाजी भरणे वय 14 वर्षे व आर्यन शालिकराम सहारे वय बारा वर्षे हे दोन्ही मुले शेळ्या चारत होते शेळ्या चारत असताना शेळ्या नदीकाठावर गेल्याने त्या शेळ्यांना नदीच्या काठावरून बाहेर हाकलण्याकरिता दोन मुलापैकी एक जण गेला मात्र त्या नदीकाठालगत चिखल असल्याने त्याचा पाय चीखलामधून घसरला आणि तो नदीमध्ये गेला नदीमध्ये पाण्याची पातळी भरपूर असल्याने तो पाण्याच्या प्रवाहामध्ये गेला पाण्याच्या प्रवाहामध्ये गेल्याचे पाहून दुसरा सोबती त्याच्या मदतीला धावला परंतु पाण्याची पातळी खोलवर असल्याने तो सुद्धा पाण्याच्या प्रवाहात बुडाला आणि त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला दोघांचाही नदीमध्ये बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती आहे यामध्ये गंगाधर हा आठव्या वर्गामध्ये तर आर्यन हा सातव्या वर्गामध्ये शिकत होते ही दोन्ही मुले नदीमध्ये बुडून मृत पावल्याने त्यांच्या आई वडिलांवरती मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे घटनेची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू असल्याचे माहिती मिळाली आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !