अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
नागभिड-
पोलीस स्टेशन तळोधीचे पोलीस निरिक्षक मंगेश भोयर यांच्या प्रमुख उपस्थित तळोधी परिसरातील जुना बस स्टाॅप, बाजार चौक, मज्जित चौक ,गोवर्धन चौक ,बाम्हणी वार्ड व इतर परिसरात पोलीस रुट मार्च करण्यात आले, आगामी मोहरम सण उत्सवाचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी या दृष्टीने रूट मार्च करण्यात आले, सवारी च्या ठिकाणाला भेट दिली व सवारी मार्गाची पाहणी करून आयोजकांची भेट घेऊन चर्चा केली. मोहरम सण शांततेत पार पाडण्याचे आव्हाण केले. सदर रूट मार्च मध्ये ठाणेदार मंगेश भोयर, पोउपनी सहदेव गोवर्धन, सफौं सुधाकर भानारकर, पोहवा कुळे, सतिश नेवारे , रत्नाकर देहारे तसेच होमगार्ड सैनिक अरुण भोले, यशवंत निकुरे, तेजराम बावनथडे, राजु नान्हे, सुनिल गजपुरे पोलीस स्टेशन मधील इतर अंमलदार व होमगार्ड सैनिक सहभागी झाले होते.