पर्यटनस्थळावर सेल्फी च्या नादात चार जणांनी गमावला जीव

0
पर्यटनस्थळावर सेल्फी च्या नादात चार जणांनी गमावला जीव 


घोडाझरी येथील घटना

चंद्रपूर:-
 आज शेगाव येथील आठ युवक चिमूर तालुक्यातील मुक्ताई येथे धबधब्याच्या आनंद घेण्यासाठी शेगाव येथून सकाळी दहा वाजता दरम्यान गेले होते, परंतु मुक्ताई मध्ये सध्या पर्यटकांना बंदी केली आहे म्हणुन नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव येथे गेले असता सेल्फीच्या नादात चार जणांना जीव गमावावा लागला आहे
 घोडाझरी येथील निसर्गसौंदर्य न्याहाळत असताना सेल्फीचा मोह झाला सेल्फी काढत असताना एका तरुणाचा पाय घसरून पाण्यात पडला त्याला वाचवण्याच्या नादात तिघेजण धावले मात्र चौघेही पाण्यात बुडाले असुन चौघांचाही जागीच मृत्यू झाला झाला आहे...

मृतांमध्ये मनीष श्रीरामे (२६)धीरज झार्डे (२७)संकेत मोडक (२५) चेतन मांदाडे (१७)
चिमूर तालुक्यातील रहिवाशी आहेत अशी माहिती मिळाली आहे. घटनास्थळावर नागभीड पोलीस स्टेशन कर्मचारी उपस्थित असून शोध मोहीम कार्य सुरू
आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !