प्रशिक्षक सुशील अवसरमोल यांचे प्रतिपादन
आष्टी :वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व शारीरिक शिक्षण विभागाद्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने प्राचार्य डॉ.संजय फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली योग कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात योग प्रशिक्षक मा.सुशील अवसरमोल यांनी विविध आसने प्रात्यक्षिकासह करून त्याचे महत्त्वही सांगितले. प्राणायाम, कपालभात, अनुलोम -विलोम, भ्रमरी अशा विविध आसनांची माहिती प्रात्यक्षिकासह उपस्थितांना दिली. दैनंदिन धावपळीच्या जीवनात शारीरिक सुदृढता अत्यंत आवश्यक आहे आणि या शारीरिक सुदृढते बरोबरच मानसिक संतुलनासाठी योग महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन योग प्रशिक्षक सुशील अवसरमोल यांनी केले . तद्वतच मनाच्या एकाग्रतेकरिता ध्यानाचे महत्वही पटवून दिले.यावेळी प्रा. डॉ. राजकुमार मुसणे, प्रा. श्याम कोरडे, वनरक्षक दीपा मंडल,प्रा. रवी गजभिये, प्रा. रवी शास्त्रकार, डॉ. भारत पांडे, प्रा. खुणे, निलेश नाकाडे, सुजित बाच्याळ, विनोद तोरे यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग ,विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. पूजा डोर्लीकर, नितेश डोके यानी कार्यक्रमाकरिता परिश्रम घेतले.

