घरी सोडून देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

0
 घरी सोडून देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन चिमुकलीवर 
लैंगिक अत्याचार



प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक

चाळीसगाव :-
राज्यासह जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये
दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून अशातच जळगाव जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक
धक्कादायक घटना समोर आली आहे.
घरी सोडून देण्याच्या बहाण्याने नराधमाने ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना चाळीसगाव शहरातून उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी काय आहे घटना

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील एका भागात ७ वर्षीय चिमुकली ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शहरातील स्टेशन रोड येथे
चिमुकली ही कामानिमित्त आलेली होती. दरम्यान "घरी सोडून देतो" असे सांगून संशयित आरोपी आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील (वय २९) रा. नारायणवाडी, चाळीसगाव याने स्कुटीवर बसून तिला शहरातील टेनिस ग्राउंड येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान चिमुकली रडू लागल्याने तिला घरी सोडून देऊन "तू जर आई-वडिलांना सांगितले, तर तुला मारून टाकेल" अशी धमकी दिली. दरम्यान आपल्यावर झालेला प्रसंग चिमुकलीने तिच्या आईजवळ कथन
केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !