सोपानदेव म्हशाखेत्री उपसंपादक वैनगंगा वार्ता
प्रभाकर देविदास दुर्गे. ( मु. अडपल्ली चक ता. मुलचेरा जि. गडचिरोली ) यांना राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार वितरण समारंभ नुकताच चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र (रत्नागिरी) चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा आणि साहित्यिकलेणी विचारमंच यांच्या वतीने राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आकर्षक मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रतिभावंत कवीयत्री भावना खोब्रागडे यांच्या हस्ते प्रभाकर देविदास दुर्गे यांचा गौरव करण्यात आला. प्रभाकर देविदास दुर्गे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव, सहसंस्थापक भावना खोब्रागडे , जिल्हा अध्यक्ष सोपानदेव मशाखेत्री , जिल्हा सचिव प्रा. नानाजी रामटेके गडचिरोली , प्रेमकुमार खोब्रागडे अशोक खंडारे, अजीत नगराळे, रोशन उके सह अनेकांनी प्रभाकर दुर्गे यांचे अभिनंदन केले आहे.