डी. के. साखरे यांच्या विरोधातील खोटे गुन्हे मागे घ्या ; बहुजन क्रांती संघाचा आंदोलनाचा इशारा
मंगळवेढा -:
आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते डी. के. साखरे यांचे विरोधात दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशन ला नोंदविलेला खोटा गुन्हा सीडीआर व सि. सि. टीव्ही फुटेज च्या आधारे रद्द करण्यात यावा तसेच मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना दारू व पैशाचे अमिष दाखवून खोटे गुन्हे नोंदविण्यास प्रवृत्त करणारे डोंगरगाव येथील जातीयवादी प्रवृत्तीचे समाजकंटक समाधान दादा हेंबाडे व परमेश्वर रतिलाल हेंबाडे यांचे विरुद्ध अट्रॅसिटी व अन्य कायद्यान्वये गुन्हे नोंदवावेत अशी मागणी बहुजन क्रांती संघाचे प्रदेश संघटक दऱ्याप्पा कांबळे यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांचे कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की ; डी. के. साखरे हे दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी 7 ते 10.30 या वेळेत मंगळवेढा शहरातील सि.सि.टीव्ही कॅमेराच्या कक्षेत असताना वरील दोन्ही हेंबाडे बंधुच्या सांगण्यावरून चर्मकार समाजातील एका विधवा महिलेने साखरे यांच्या विरुद्ध खोटा, बनावट व रचनात्मक स्वरूपाचा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात समाधान हेंबाडे व परमेश्वर हेंबाडे वापरत असलेल्या मोबाईल नं. 9096934669 व 8669000548 या दोन्ही मोबाईल नंबरची सायबर क्राईम मार्फत दिनांक 14 फेब्रुवारी 2023 ची कॉल डिटेल्स व लोकेशन चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली असून साखरे यांच्या वरील अन्याय दूर न झाल्यास दिनांक 3 जुलै 2023 पासून पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा कांबळे यांनी आपल्या निवेदनात दिला असून त्याच्या प्रती विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परीक्षेत्र कोल्हापूर, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा व पोलीस निरक्षक पोलीस ठाणे मंगळवेढा यांना दिले आहेत.

