३० वर्षीय काजलने रेल्वे समोर उडी घेवून केली आत्महत्या

0
 ३० वर्षीय काजलने रेल्वे समोर उडी घेवून केली आत्महत्या




मूर्तिजापूर :-
 शहरात गेल्या दोन तीन दिवसांपासून रेल्वे समोर महिलेच्या आत्महत्येचे सत्र सुरु झाले असून आजही एका 30 वर्षीय महिलेच्या आत्महत्येने शहर हादरून गेले आहे. सौ. काजल संकेत कांबे  वय  30 वर्षे असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून शहरातील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ. राजेश कांबे यांच्या सुनबाई असून काजल यांच्या लग्नाला 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ३० वर्षीय काजल कांबे ह्या स्वतःची स्कूटर घेवून चिखली गेटच्या रेल्वे ट्रॅकवर गेल्या असता पुणे- अमरावती सुपर फास्ट रेल्वे येताच त्यांनी समोर उडी घेतली रेल्वे चालकाच्या लक्षात येतात गाडीचे ब्रेक लावण्यात आले मात्र धडकेने काजल यांचा जीव वाचू शकला नाही. तिच्या गळ्यात मंगळसुत्र, रस्त्याच्या कडेला स्कुटर उभी होती व रुळाजवळ पर्स आढळून आली.
या घटनेची माहिती मिळताच श्री गजानन आपत्कालीन पथक यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन यादव यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वानखडे करीत आहेत 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !