विज दुरुस्तीचे काम करणाऱ्या लाईनमनचा विजेचा धक्का लागून मृत्यू
गडचिरोली :-
दिनांक:-19/06/2023 तालुक्यातील येवली सर्कलच्या लाईनमनचा खांबावर चढून लाईन दुरुस्त करताना विजेचा धक्का लागून मृत्यु झाल्याची घटना दिनांक 19 जून सोमवारी सकाळच्या सुमारास दर्शनी माल येथे घडली.
वैभव जेंगठे वय 22 वर्ष असे मृत पावलेल्या लाईनमनचे नाव आहे.
सकाळच्या सुमारास वैभव हा दर्शनी माल येथे खांबावर चढून विज दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेला असता अचानक विज प्रवाह सुरू झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो खांबावरच मृत पावला. वैभव हा विजेच्या खांबावर चढून लाईन दुरुस्त करत असताना लाईन सुरूच असल्याची प्राथमिक माहिती आहे. थोड्याशा दुर्लक्षामुळे विकासला नाहक आपला जीव गमवावा लागला. वैभव हा मूळचा ब्रम्हपुरी तालुक्यातील मंगरमेंढा येथील आहे.
वैभव हा येवली परिसरात तत्परतेने काम करणारा लाईनमन म्हणून सुपरिचित होता. त्यांच्या अशा दुर्दैवी मृत्युने जेंगठे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून येवली परिसरात सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.

