कारमध्ये गुदमरून तीन लेकरांचा मृत्यू
नागपूर:-
नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारमध्ये गुदमरून तीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तीन मुले खेळत असताना सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने पालकांनी पोलिसांशी संपर्क साधून अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र तपासात पोलिसांना त्यांचे मृतदेह घरापासून ५० मीटर अंतरावर एका एसयूव्ही कारमध्ये
आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौफीक फिरोज खान (4), आलिया फिरोज खान (6) आणि आफरीन इर्शाद खान (6) ही तिघेही फारूक नगर येथील तीन मुले शनिवारी दुपारी खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती.
पाचपोली पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी मुलांची चौकशी सुरू केली. तेव्हा एका हवालदाराच्या
नजरेस एक एसयूव्ही घरापासून काही अंतरावर उभी होती. ज्याच्या आत तीन मुले पडलेली आढळली..
पोलिसांनी गाडीचा दरवाजा उघडला तेव्हा सर्व मुले मृतावस्थेत होती. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, खेळत असताना मुलांनी कारचा दरवाजा
आतून बंद केला. मग तो दरवाजा उघडता आला नाही.
उष्णता आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्याने सांगितले की, तौफिक आणि आलिया भावंडे आहेत, तर आफरीन शेजारी राहत होते

