खेलो इंडिया धनुर्विद्या सेंटर आष्टी येथील स्मित जोरगलवार याची मणिपूर येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीयस्तरावर निवड

0
खेलो इंडिया धनुर्विद्या सेंटर आष्टी येथील स्मित जोरगलवार याची मणिपूर येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीयस्तरावर निवड


आष्टी (अशोक खंडारे):-
अमरावती येथे झालेल्या दि. १७ डिसेंबर ते २० डिसेंबर १७ व १९ शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये खेलो इंडिया धनुर्विद्या सेंटर आष्टी जि. गडचिरोली येथील स्मित स्नेहा संदीप जोरगलवार याने १९ या वयोगटा मध्ये  ३०मी कांस्य पदक,टीम इव्हेंट रौप्य पदक,वैयतिक इव्हेंट कांस्य असे ३ पदक जिंकून इम्फाळ मणिपूर येथे होणाऱ्या शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत करिता महाराष्ट्राचा संघात निवड झाली आहे.अमरावती येथे दिनांक १७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२५ शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये खेलो इंडिया धनुर्विद्या सेंटर आष्टीचा आर्चर स्मित यांनी राष्ट्रीय स्तरावर जाण्याचा वेध घेतला आणि त्यामधून त्याची एकमेव खेळाडूची वरिष्ठ स्तरावर धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली.धनुर्धर स्मित स्नेहा संदीप जोरगेलवार याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्या बद्दल त्याच्या पालकांनी विजयी धनुर्धर खेळाडूचे अभिनंदन केले. या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे व जिल्हा क्रीडा विभागाने स्मितचे अभिनंदन केले तसेच पुढील होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या सर्व खेळाडूंना धनुर्विद्याचे प्रशिक्षण डॉ. श्याम कोरडे यांचे मोलाचे मागदर्शन लाभले तसेच रोशन साळंके, कौमुदी श्रीरामवार यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले त्या सर्व यशस्वी खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय डॉ.श्याम कोरडे व सुशील अवसरमोल यांना दिले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !