गडचिरोली /नवेगाव येथे भव्य सार्वजनिक क्रीडांगण उभारण्याची युवा - युवती, महिला व नागरिकांची मागणी

0
गडचिरोली /नवेगाव येथे भव्य सार्वजनिक क्रीडांगण उभारण्याची युवा - युवती, महिला व नागरिकांची मागणी



 लोकप्रतिनिधींना निवेदन सादर 

गडचिरोली:-
गडचिरोली नवेगाव एरिया येथील वाढती लोकसंख्या आणि तरुण खेळाडूंची संख्या लक्षात घेता, शहरात एका सुसज्ज सार्वजनिक क्रीडांगणाची अत्यंत आवश्यकता आहे. सध्या शहरात मोकळ्या जागांचा अभाव असल्याने खेळाडूंना सरावासाठी आणि लहान मुलांना खेळण्यासाठी रस्त्यावर किंवा खासगी जागांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे तातडीने क्रीडांगण विकसित करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांत नवेगाव -  मुरखळा, कोटगल , कनेरी, पारडी,  इंदाळा परिसराचे झपाट्याने शहरीकरण झाले आहे. मात्र, खेळाडूंसाठी हक्काचे मैदान नसल्याने स्थानिक गुणवंत खेळाडूंच्या प्रगतीत अडथळे येत आहेत. 26 ऑगस्ट 1982 रोजी गडचीरोली जिल्ह्याची स्थापना झाली त्यावेळी स्नेहा नगर लांजेडा येथे एक क्रीडा संकुल उभारण्यात आले होते पण येथील तरुणांना १० ते १२ किलो मिटर लांब प्रवास करून जाणे जिकरीचे ठरत आहे, तसेच MIDC पोलीस ग्राउंड हे पोलीस विभागाच्या अधिकार  क्षेत्रात येत असून ते सार्वजनिक खुले क्रीडांगण नाही ते कधीपण प्रवेश बंदी करतात.त्यामुळे नवेगाव,मुरखला, कणेरी, पारडी, इंदाला,सोनापुर,कम्पेक्स, कोटगल, येथील तरुणांना, ज्येष्ठ नागरिक,महिला, लहान मुले यांना मैदानाअभावी मैदानी खेळांपासून लांब राहावे लागत असून, याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होत  आहे. त्यामुळे नवेगाव मध्ये हक्काचे असे सार्वजनिक क्रीडांगण तयार करणे काळाची गरज ठरली आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या:
१. परिसरात आरक्षित असलेल्या सरकारी मालकीच्या सर्वे नंबर ४८ या भूखंडावर तातडीने क्रीडांगण विकसित करावे.
२. धावण्यासाठी ट्रॅक (Running Track) आणि व्यायामासाठी ओपन जिमची सुविधा द्यावी.
३. मैदानाभोवती संरक्षक भिंत आणि रात्रीच्या वेळी  प्रकाशव्यवस्थेसाठी (Floodlights) सोय असावी.
4. महिला, नागरीक, लहान मुले यांच्याकरिता योगा, विविध खेळाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे.
या मागणीसाठी परिसरातील ज्येष्ठ महिला,नागरिक, खेळाडू आणि तरुणांनी एकत्र येत स्थानिक पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवर  निवेदन दिले आहे. जर प्रशासनाने याकडे लवकर लक्ष दिले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !