कला विभागाच्या प्रथम वर्षाच्या युवतीने गळफास लावून केली आत्महत्या
आरमोरी तालुक्यातील रामपूर येथील घटना
आरमोरी- :
तालुक्यातील रामपूर येथील एका युवतीने स्वतःच्या घरीच गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १९ जानेवारीला दुपारी ३.०० ते ३.३० वाजताच्या सुमारास घडली.
पूजा चंद्रशेखर ठाकरे वय वर्ष १९ रा.रामपूर ता. आरमोरी असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून ती बी.ए.प्रथम वर्षात शिकत होती.
प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सदर आत्महत्या करणाऱ्या युवतीचे आई-वडील हे आरमोरी येथे बाजार करण्यासाठी गेले होते.तर तिचा भाऊ शेळ्या चारण्यासाठी शेतात गेला असल्याने घरी कुणीच नसल्याचे पाहून सदर युवतीने दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली.युवतीचे आई वडील घरी येताच ती गळफास घेतल्याचे दिसून आले.या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून तिचे प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.आरमोरी पोलिसांनी प्रथमदर्शनी मर्ग दाखल केला असून अधिक तपास आरमोरी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती राक्षे करीत आहेत.

