तंटामुक्त गाव समित्या प्रेमविवाह लावण्यात तरबेज गावखेड्यातील ईतर बाबींकडे दुर्लक्ष

0
तंटामुक्त गाव समित्या प्रेमविवाह लावण्यात तरबेज

गावखेड्यातील ईतर बाबींकडे दुर्लक्ष



अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

अमिर्झा:- महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे प्रत्येक गावात गठण करण्यात येऊन ती समीती गाव विकासासाठी आवश्यक कामे करेल यासाठी शासनाने ह्या समित्या स्थापन केल्या होत्या परंतु या समितीच्या माध्यमातून विकासाची कोनतिही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही मात्र प्रेमवीरांचे लग्न लावून देण्यात येत आहेत.
असाच प्रेमविवाह महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अमिर्झाच्या वतीने तथा गावकरी लोकांच्या साक्षीने  6/11/2022 रोजी अमिर्झा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तंटामुक्त गाव समिती तथा गावकरी तथा ग्रामपंचायतच्या पदाधिकारी यांच्या साक्षीने प्रेमीयुगूलाचा विवाह लावून देण्यात आला.

प्रेमवीर आकाश अरुण घोडमारे वय 27 वर्ष मु+पो.अमिर्झा ता+जि.गडचिरोली व
उर्मिला बंडूजी गायकवाड वय 22 वर्ष मु.उसरपार तुकुम पो.पाले ता.सावली जि.चंद्रपूर ही येथील रहिवासी आहे.
या प्रेमीयुगूलाचा मागील काही वर्षापासून प्रेम संबंध होते. त्यांनी अमिर्झा तंटामुक्ती कडे रीतसर अर्ज केला होता. तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने या दोघांचा विवाह लावून देण्यात आला या लग्न सोहळ्याला तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुजित आखाडे, उपसरपंच संदीप भैसारे, ग्रामपंचायत सदस्य पंढरी चौके, मनोज भानारकर,रमेश चौधरी, धनराज चौधरी,सुरेश नागरे,राजू पठाण, चंदू करंडे, अजय शिरपूरवार, महेश देशमुख, मोहन देशमुख, बापूशा ढोणे, देवनाथ बनकर, मोहन कुकुडकार, मंदाबाई सावसाकडे, कालिदास श्रीरामे, चेतन घोडमारे, टीकाराम नन्नावरे, स्वप्निल चौधरी आदी उपस्थित होते.
या प्रेमीयुगुलांच्या कुटुंबाचा लग्नास मुलीच्या आई-वडिलांचा विरोध असल्याने अमिर्झा तंटामुक्त गाव समितीच्या सहकार्याने लग्न लावून देण्यात आला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !